
मुंबईत फक्त मराठीच! सुप्रीम कोर्टाने व्यापाऱ्यांची याचिका फेटाळली, दोन महिन्यात सूचनाफलक बदलण्याचे आदेश
सुप्रीम कोर्टाने मुंबईतील व्यापाऱ्यांना मराठीत नवीन फलक लावण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली आहे. महाराष्ट्र शासनाने गेल्या वर्षी मुंबईतील सर्व व्यापाऱ्यांना मराठीत सूचनाफलक लावणे बंधनकारक केले होते.महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाविरोधात व्यापारी संघटनांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने देखील महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाची दखल घेतली होती.
न्यायमूर्ती बी.व्ही. नागरथना आणि उज्वल भुईया यांच्या खंडपीठाने सांगितले की, ‘मराठीत फलक लावण्यासाठी तुमच्याकडे दिवाळी आणि दसऱ्यापूर्वीपर्यंतचा वेळ आहे. तुम्ही महाराष्ट्रात आहात आणि तुम्हाला मराठी सूचनाफलक लावण्याचे फायदे माहीत नाहीत. मुंबई रिटेल व्यापारी असोसिएशनच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ही टिप्पणी केली.
व्यापारी रिटेल असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्याचे पालन करण्याचे मान्य केले. तसेच त्यांच्या याचिकांमध्ये उपस्थित केलेल्या घटनात्मक मुद्द्यांचा 2 महिन्यांनंतर विचार करण्यात यावा, असेही सांगितले. चर्चेदरम्यान प्रिया यांनी 4 महिन्यांची वेळ देण्याचे आवाहन केले. हे फलक तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि मजूर इतक्या कमी वेळेत उपलब्ध होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, खंडपीठाने त्याला केवळ दोन महिन्यांचा अवधी देण्याचे मान्य केले. या प्रकाराने व्यापारी संघटनेला निश्चितच धक्का बसला.
www.konkantoday.com