मासेमारी बंदी कायद्यामुळे हर्णै बंदरातील नौका किनार्‍यावर विसावल्या

देशाच्या पश्‍चिम किनारपट्टीवर जुन व जुलै या दोन महिन्यांसाठी असलेल्या मासेमारी बंदी कायद्यामुळे हर्णै बंदरातील मासेमारी थांबली असून नौका किनार्‍यावर विसावलेल्या दिसत आहेत. आता नवीन मासेमारी हंगाम १ ऑगस्टला सुरू होणार असून तोपर्यंत हर्णै बंदरातील लाखोंची उलाढाल ठप्प राहणार आहे.
जिल्ह्यातील मोठे मासेमारी बंदर असलेल्या हर्णै बंदरात साधारण ८०० लहान-मोठ्या नौका आहेत. यापैकी किमान ७० ते ८० नौका दररोज आपले मासे येथे उतरवतात. भांडवलदारांच्या तुलनेत येथे छोट्या नौका असल्याने या नौकांची प्रत्येक मासेमारी फेरी मोठ्या नौकांप्रमाणे १० ते १२ दिवसांची न राहता फक्त ५ ते ६ दिवसांचीच राहते. त्यामुळे येथे अधिक ताजे मासे मिळत असल्याचे मच्छिमारांचे म्हणणे आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button