चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातून अपेक्षित मताधिक्य न मिळाल्याने शिवसेना उबाठाच्या मंगेश शिंदेंचा राजीनामा
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून शिवसेना उबाठाचे नेते विनायक राऊत यांना चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातून मोठे मताधिक्य अपेक्षित असतानाही पक्षांतर्गत असलेल्या बंडामुळे ते मिळालेले नाही. त्यांच्या पराभवामुळे आता शिवसैनिकांना कुणी वालीच राहिलेला नसल्याने पक्षाचे जिल्हा समन्वयक मंगेश शिंदे यांनी आपल्या पदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना उबाठात खळबळ उडाली आहे.
मंगळवारी झालेल्या निवडणूक निकालात शिवसेना उबाठा पक्षाचे सचव आणि शिवसेना नेते राऊत यांचा पराभव झाला. यामुळे राऊत यांना मताधिक्य देणार्या चिपळुण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक अस्वस्थ झाले. यातून राऊतांचा पराभव जिव्हारी लागलेल्या जिल्हा समन्वयक शिंदे यांनी आपल्या पदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा राऊत यांच्याकडे पाठवला आहे.
www.konkantoday.com