रायगड लोकसभा मतदारसंघात त्या दोन अनंत गीते उमेदवारांनी साडेपाच हजार मते घेतली
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे रायगडचे उमेदवार सुनिल तटकरे यांचा विजय झाला आहे. रायगडमध्ये सुनिल तटकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गिते यांचा पराभव केला आहे.रायगड लोकसभा निवडणुकीमध्ये सुनिल तटकरे यांनी अनंत गिते यांना 82,784 मतांनी पाडलं. या निवडणुकीत रायगड मतदारसंघात अनंत गिते नावाचे 3 उमेदवार रिंगणात होते. यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनंत गितेंना 4,25,568 मतं मिळाली. तर दुसऱ्या अनंत गितेंना 3,515 आणि तिसऱ्या अनंत गिते यांना 2,040 एवढी मतं मिळाली.याआधी 2014 साली रायगडमध्येच सुनिल तटकरे आणि अनंत गिते यांच्यात सामना झाला होता. या निवडणुकीत दोन सुनिल तटकरे रिंगणात होते, त्यावेळी अपक्ष सुनिल तटकरेंनी 9 हजार 849 मतं घेतली होती. राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरेंचा त्या निवडणुकीत 2 हजार मतांनी पराभव झाला होताwww.konkantoday.com