चिपळूण नगर परिषद शहरातील विविध भागात हजारो वृक्षांची लागवड करणार
यावर्षी चिपळूण नगर परिषद शहरातील विविध भागात हजारो वृक्षांची लागवड करणार आहे. त्यासाठी वृक्षही उपलब्ध करण्यात आले आहेत. या लागवडीचा शुभारंभ ५ जून या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शहरातील शंकरवाडी येथील नवीन वसाहत येथून सकाळी ९.३० वा. केला जाणार आहे. तसेच नागरिकांनाही मोफत वृक्ष दिले जाणार असून त्यासाठी नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सर्वत्र होणारी वृक्षतोड त्या बदल्यात न होणारी लागवड याचा परिणाम वातावरणावर होत असून दरवर्षी उष्म्यात मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पावसाळ्यात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याच्या सूचना शासनस्तरावरून केल्या जात आहेत. त्यामुळे दरवर्षी नगर परिषदेच्या उद्यान विभागाच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून झाडे लावली जातात. यावर्षी हजारो झाडे लावण्याचा संकल्प मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केला आहे. तशा सूचना त्यांनी उद्यान विभागाला दिल्या आहेत. www.konkantoday.com