मुंबई-गोवा महामार्गावर लोटेत डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे. पिरलोटे येथील चिरणीकडे जाणार्या रस्त्यानजिक डंपरच्या धडकेने लक्ष्मण मनोहर येळवी (४२, सध्या रा, चिरणी रोड) या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी डंपर चालकावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदू दौडामणी (रा. वालोपे-चिपळूण) असे गुन्हा दाखल झालेल्या डंपर चालकाचे नाव आहे. यातील दुचाकीस्वार लक्ष्मण येळवी हे एम.एच. १२ जे. बी. ८९२८ क्रमांकाच्या दुचाकीला मागून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, डंपरचे चाक दुचाकीस्वाराच्या डोक्यावरून गेल्याने जागीच मृत्यू झाला. अपघाताचे वृत्त कळताच लोटे येथील पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. या प्रकरणी डंपर चालकावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. www.konkantoday.com