
किरण सामंतांच्या प्रयत्नाने खंडीत केलेला वीज पुरवठा पूर्ववत.
सिंधुरत्न समृद्ध योजनेचे सदस्य व शिवसेना नेते किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या प्रयत्नाने राजापूर नगर परिषदेच्या शीळ येथील जॅकवेलच्या खंडित केलेला वीजपुरवठा महावितरण विभागाने पूर्ववत केला आहे.राजापूर शहराला पाणीपुरवठा करणार्या शीळ जॅकवेलसह डंपींग ग्राऊंड व अन्य वीजपुरवठ्याचे सुमारे १७ लाख रुपयांचे बील मागील चार ते पाच महिन्यांपासून थकल्याने महावितरण विभागाने शीळ येथील जॅकवेलचा वीजपुरवठा सोमवारी खंडीत केला होता. याचा फटका शहराती पाणीपुरवठ्याला बसण्याची शक्यता होती. त्यामुळे याबाबत किरण उर्फ भैय्या सामंत यांना माहिती मिळताच त्यांनी महावितरणच्या अधिकार्यांशी संपर्क साधून नगर परिषदेला थकीत वीजबिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्यासोबतच खंडित केलेला वीजपुरवठा सुरू करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार शीळ जॅकवेल येथील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. www.konkantoday.com