
ऑनलाईन आरक्षण करूनही एसटी बस नसल्याने प्रवासी रखडले
दोन दिवसांपूर्वी ऑनलाईन आरक्षण करूनही कोल्हापूर येथून रत्नागिरीत जाणारी एसटी बस नसल्याने दहा ते पंधरा प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. एसटीच्या वर्धापनदिनीच प्रवाशांची गैरसोय झाल्याबद्दल प्रवाशांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. एसटी अधिकार्यांशी संपर्क साधल्यानंतर दुसर्या गाडीतून प्रवास करण्याची वेळ या प्रवाशांवर आली. ब्रेक डाऊनमुळे रत्नागिरीतून कोल्हापूरला एसटी बस न गेल्यामुळे ही वेळ आली. याबद्दल अधिकार्यांनीही खंत व्यक्त केली. व दुसर्या गाडीतून व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले. www.konkantoday.com