
रत्नागिरी जिल्ह्यांतील धरणात केवळ ३७.४१ टक्के इतकाच पाणीसाठा
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या वाढत्या तापमानाचा परिणाम येथील पाण्याच्या स्त्रोतांवर झालेला आहे. वाढत्या उष्म्यामुळे जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या धरणांमधील पाणीसाठ्याच्या टक्केवारीमध्ये कमालीची घसरण झालेली आहे. जिल्ह्यात आजमितीला ४६ लघुपाटबंधारे प्रकल्पांमध्ये ३७.४१ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. पाऊस थांबल्यास मात्र पाणीसंकट अधिक गडद होण्याची दाट शक्यता आहे. www.konkantoday.com