आरजूचा मास्टरमाईंड अनीचा सुरूवातीपासूनच फसवणुकीचा प्लॅन,लोकेशनचाही चकवा

रत्नागिरीतील आरजू टेक्सोल कंपनीचा फरार असलेला मास्टरमाईंड अनी जाधव याचा ठावठिकाणा काढण्यासाठी पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे. त्याने या गुन्ह्यातून बचावण्यासाठी जसे कंपनीच्या कागदपत्रांमध्ये कुठेही नाव न येण्याची खबरदारी घेतली त्याचप्रमाणे स्वतःचे लोकेशन पहिल्या स्टेजमध्ये सापडू नये यासाठी देखील चतुराई दाखवली आहे. त्याने दुसर्‍यांच्या नावे मोबाईल सिमकार्ड घेतली होती. पोलिसांनी तपास केल्यानंतर त्याने वापरलेल्या सिमकार्डच्या दुसर्‍याच व्यक्ती मालक असल्याचे पुढे आले आहे.आरजू टेक्सोलचा मास्टरमाईंड अनी जाधव या फसवणुकीच्या गुन्ह्यात स्वतःचा बचाव करण्यासाठी गुन्हा दाखल होण्यापूर्वीच खबरदारी घेतल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. येथील एमआयडीसीतील एका हॉटेलमध्ये केवळ १५ ते२० दिवस अनी जाधव हा शेफ म्हणून काम करत होता. त्याच दरम्यान अनी जाधव याने अल्पकालावधीत स्थानिकांशी ओळख केली. त्या ओळखीनंतर स्थानिक सहकार्‍यांना त्याने हा गुंतवणुकीचा फंडा सांगितला आणि त्यातून आरजू टेक्सोल कंपनी स्थापन झाली. विशेष म्हणजे हा मास्टरमाईंड कंपनीमध्ये कोणत्याच पदावर राहिलेला नाही. पडद्यामागून त्याने ही सूत्र हलवत कंपनी चालवल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button