माडबन किनार्‍यावरील सॅण्डबार हटविण्याचे काम सुरू

राजापूर ः तालुक्यातील जैतापूर खाडीच्या मुखाशी सुमारे चार फूट उंच व पाचशे मीटर लांबीचा वाळूचा डोंगर तयार झाला असून तो पावसाळ्यापूर्वी हटविण्यासाठी आमदार राजन साळवींनी निवासी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले होते. त्या पार्श्‍वभूमीवर आ. राजन साळवींच्या प्रयत्नाने जेसीबीने सदर सॅण्डबार हटविण्याचे काम सुरू झाले आहे.
माडबन व मिठगवाणे हद्दीत सुमारे चार फूट उंच व पाचशे मीटर लांबीचा वाळूचा सॅण्डबार नैसर्गिकरित्या तयार झाला असून त्यामुळे भरतीचे पाणी खाडीत येणे बंद झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button