बालविवाह करून मातृत्व लादल्याप्रकरणी अटकेत असलेल्या संशयित आरोपीला जामीन
अल्पवयीन मुलगी सोबत बालविवाह करून मातृत्व लादल्याप्रकरणी अटकेत असलेल्या संशयित आरोपी अनिल निकम (रा. देवघर, ता.खेड, जि. रत्नागिरी) याचा उच्च न्यायालयाने अटी व शर्तीवर जामीन अर्ज मंजूर केला आहे.येथील पिडीत अल्पवयीन मुलगी सोबत बालविवाह केल्या प्रकरणी व ती अल्पवयीन असल्याचे माहित असतानासुध्दा संशयित आरोपी अनिल निकम, (रा. देवघर, ता.खेड, जि. रत्नागिरी) यांनी तीच्या सोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने ती गरोदर राहीली, त्याबाबतची तकार खेड पोलीस स्टेशन येथे देण्यात आलेली होती. खेड पोलीसांनी केलेल्या तपासकामी पिडीतेचा जबाब घेण्यात आला, त्यानुसार खेड पोलीस ठाण्यात नुसार अनिल निकम यांच्या विरूध्द तक्रार दाखल करण्यात आली व 10 मे 2024 रोजी अटक करण्यात आली. संशयिताच्यावतीने खेड जिल्हा व सत्र न्यायालय येथे जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. संशयिताच्यावतीने अॅड. स्वरूप सुबोध थरवळ यांनी जामीन अर्जवर युक्तीवाद केला व उच्च न्यायालयाचे निकाल हजर केले, अॅड. थरवळ यांचा युक्तीवाद व उच्च न्यायालयाचे निकाल ग्राहय धरून संशयित आरोपीचा काही अटी व शर्तीवर जामीन अर्ज मंजूर करण्यात आला.www.konkantoday.com