
पावस परिसरामध्ये वनविभागातर्फे वानर, माकडांची गणना
पावस परिसरामध्ये वनविभागातर्फे वानर, माकडांची गणना करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरवात झाली आहे.वनविभागाचे कर्मचारी प्रत्येक गावांमधून वानर, माकडांची संख्या मोजत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा मुख्य हेतू सफल होणार नसल्याने नाराजीचा सूर निघत आहेया परिसरामध्ये वानर, माकडांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे त्याचा फटका शेतकरी, बागायतदारांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. या विरोधात ठोस उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला अनेक निवेदने देण्यात आली. त्यानंतर वानर, माकडे पकडून त्यांना जंगलात सोडण्यासाठी निधी उपलब्ध झाला. त्यासाठी वनविभागाला वाहन देण्यात आले. काही ठिकाणी माकडांना पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्याचे प्रयत्न झाले; परंतु म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे वानर, माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे.www.konkantoday.com