
लवेल येथे धाब्याजवळ गांजा विकण्यासाठी आलेला इसम मुद्देमालासह ताब्यात
मुंबई गोवा महामार्गावरील लवेल नजीकच्या एका धाब्याजवळ खेड पोलीसांनी कारवाई करून गांजा विकण्यासाठी आलेल्या इसमास मुद्देमालासह ताब्यात घेतले. इत्सियाक कादीर असे या वर्षीय संशयीताचे नाव असून त्याच्याकडून पोलिसानी ५१४ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे .
या परिसरात घाणेखुंट गवळीवाडी येथील एकजण पांढऱ्या रंगाच्या टाटा इंडिका कारमधून गांजा विकण्यासाठी येणार असल्याची खबर खेड पोलिसांना मिळाली होती . या नुसार पोलिसानी केलेल्या कारवाईत गांजा ‘ इंडिका कार , मोबाईल असा ५० हजार रूपयांचा माल जप्त करण्यात आला.
www.konkantoday.com