कोकण मार्गावरील रत्नागिरी-वैभववाडी विभागादरम्यान च्या मेगाब्लॉकमुळे अनेक गाड्या उशिरा

कोकण मार्गावरील रत्नागिरी-वैभववाडी विभागादरम्यान शुक्रवारी घेण्यात आलेल्या अडीच तासांच्या मेकाब्लॉकमुळे ६ रेल्वेगाड्यां उशिरा धावल्या . ०१४६३ क्रमांकाची एलटीटी-कोच्युवेली स्पेशल तब्बल ४ तास विलंबाने मार्गस्थ झाल्याने प्रवाशांची रखडपट्टी झाली अन्य ५ रेल्वेगाड्यांचे वेळापत्रकही बिघडले.१०१०६ क्रमांकाची सावंतवाडी-दिवा पॅसेंजर २ तास ४५ मिनिटे तर १११०० क्रमांकाची मडगाव-एलटीटी एक्सप्रेस २ तास ३५ मिनिटे विलंबााने रवाना झाली. १२०५१ क्र. ची सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी १ तास २५ मिनिटे तर १२६१८ क्र. ची निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस १ तास ४५ मिनिटे उशिराने मार्गस्थ झाली. २२११९ क्र. ची सीएसएमटी-मडगाव तेजस एक्सप्रेसही १ तास २० मिनिटे विलंबाने धावली. उर्वरित रेल्वेगाड्या निर्धारित वेळेत मार्गस्थ झाल्याने प्रवाशांना काही अंशी दिलासा मिळाला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button