भारतीय जनता पार्टी तर्फे जितेंद्र आव्हाड यांचा जोरदार निषेध

भारतीय जनता पार्टी तर्फे जितेंद्र आव्हाड यांचा जोरदार निषेध करण्यात आला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडण्याच्या कृती विरुद्ध जिल्हा शासकीय रूग्णालय रत्नागिरी समोर हे आंदोलन करण्यात आले.शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून समस्त देशवासीयांचा अपमान केला आहे. त्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध म्हणून रत्नागिरी येथे भारतीय जनता पार्टी तर्फे जिल्हा शासकीय रूग्णालय समोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर आमदार जितेंद्र आव्हाड यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध आंदोलन करण्यात आले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button