
प्लास्टिक मुक्तीसाठी चिपळूण न.प.मध्ये तांब्या-पेल्यातून पाणी उपलब्ध करून देण्याचा आगळा उपक्रम
प्लास्टिक मुक्तीसाठी मुख्याधिकाारी विशाल भोसले यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. ५ जून या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नगर परिषद कार्यालयातून प्लास्टिकच्या बाटल्या हद्दपार करण्यासाठी त्यांनी प्रत्येक विभागातील कर्मचार्यांच्या टेबलावर आता तांब्या-पेल्यातूनच पाणी ठेवण्याचे व नागरिकांनाही तेच पाणी देण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सूचनांचे पालन न करणार्या कर्मचार्यांवर कारवाई होणार आहे.गेल्या काही वर्षापासून नगर परिषद शासन आदेशानुसार प्लास्टिकमुक्ती करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्याला काही अंशी यश येत असले तरी आजही बाजारपेठेत प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असून शहरासह गटारांमध्ये प्लास्टिक बाटल्यांचा खच दिसत आहे. त्यामुळे बाटल्यांचा वापर टाळा, हा संदेश नागरिकांना देण्यासाठी मुख्याधिकारी भोसले यांनी हा नवा उपक्रम आणला आहे. आज नगर परिषदेत फेरफटका मारल्यानंतर अधिकार्यांपासून अगदी कर्मचार्यांपर्यंत प्रत्येकाच्या टेबलावर पाण्याची प्लास्टिकची बाटली दिसते. अपवादात्मक कर्मचारी अन्य बाटल्या वापरतात. त्यामुळे नगर परिषदेतूनच प्लास्टिकच्या बाटल्या हद्दपार करण्यासाठी ५ जूनपासून सर्वांच्या टेबलावर पाण्याचा तांब्या व त्यावर पेला ठेवण्याच्या सूचना मुख्याधिकारी भोसले यांनी दिल्या आहेत. www.konkantoday.com



