
शीळच्या समांतर लाईनसाठी निधी देण्यासाठी किरण सामंत यांच्याकडे राजापूरवासियांच्यावतीने साकडे
गेली कित्येक वर्षे राजापूरकरांना कोदवली येथील नवीन धरणाचे गाजर दाखवून चोवीस तास पाणी पुरवठ्याचे आश्वासन दिले जात आहे. मात्र अजून दहा कोटी रुपये जगी खर्च केले, तरी राजापूर शहरवासियांना दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे उद्योजक किरण सामंत यांना राजापूरकरांना पाणी द्यायचे असेल तर या धरणाऐवजी शीळ जॅकवेलमधून समांतर पाणीपुरवठा वाहिनीसाठी निधी द्यावा आणि ते काम मार्गी लावावे, अशी मागणी राजापूरचे माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी यांनी केली आहे.या धरणाच्या कामात पाणी मुरत असून या झालेल्या कामाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी एक शिष्टमंडळ पालकमंत्री ना. उदय सामंत व किरण सामंत यांची भेट घेवून पुराव्यासह आपली कैफियत मांडणार असल्याचेही काझी यांनी जाहीर केले आहे.www.konkantoday.com