
काल दिवसभरात राज्यात करोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव मागील काही दिवसांमध्ये अधिकच झपाट्याने वाढत आहे. काल दिवसभरात राज्यात करोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठल्याचे दिसून आले. तब्बल २० हजार ४८९ नवे करोनाबाधित काल आढळून आले तर ३१२ जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ८ लाख ८३ हजार ८६२ वर पोहचली आहे. , दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात १० हजार ८०१ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
www.konkantoday.com