वनविभागाने केले विसापूर येथून खैराचे लाकूड जप्त, दापोली परिसरात खळबळ
शिवणे (सांगोला, जि. सोलापूर) येथे अवैध खैर झाडाची तोड करून ते लाकूड विनापरवाना विसापूर (दापोली) येथील गुरूकृपा कात उद्योगाला दिल्याचे निष्पन्न झाल्याने हे लाकूड जप्त करण्याची कार्यवाही बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या कारवाईने दापोली परिसरात खळबळ उडाली आहे.वन विभाग सोलापूरमधील सांगोला परिक्षेत्रातील मौजे शिवणे हद्दीतील शासकीय वनक्षेत्रात खैर जातीच्या वृक्षांची अवैध वृक्षतोड आढळून आली. त्या अनुषंगाने परिक्षेत्र वन अधिकारी यांनी गुन्हा नोद केला आहे. अवैध वृक्षतोडीबाबत नोंद गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासा अंतर्गात आढून आलेल्या आरोपींकडे अधिक चौकशी केली असता शासकीय वन क्षेत्रातील अवैध वृक्षतोडीमधील खैर लाकूड माल रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मौजे विसापूर येथील गुरूकृपा कात उद्योग येथे आणला असल्याची माहिती निष्पन्न झाली. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने रत्नागिरी वन विभागातील परिक्षेत्र वन अधिकारी यांचेशी संपर्क साधून परिक्षेत्र वन अधिकारी सांगोला व परिक्षेत्र वन अधिकारी दापोली यांनी संयुक्त कारवाई केली. www.konkantoday.com