सवेष साभिनय नाट्य गीत गायन स्पर्धेत सार्था गवाणकर प्रथम
रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्तरीय सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धेत रत्नागिरीच्या सार्था नरेंद्र गवाणकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. सावंतवाडी तालुक्यातील आजगाव येथील श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग, स्वयंभू कला क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा घेण्यात आली होती. ही स्पर्धा आजगावच्या श्री वेतोबा मंदिरात झाली.स्पर्धा गवाणकरने सवेष, साभिनय सादरीकरण करताना आपल्या गोड गळ्याने, बहारदार सादरीकरणाने उपस्थितांसह परीक्षकांवर मोहिनी घातली. तिने भूमिकन्या सीता नाटकातील मी पुन्हा वनांतरी हे नाट्य पद सादर केले. या स्पर्धेच्या परीक्षणासाठी ख्यातनाम शास्त्रीय गायिका विदुषी श्रुती सडोलीकर उपस्थित होत्या. सार्था गवाणकरने सवेष साभिनय नाट्यगीत सादर करताना ८ ते १६ वयोगटात राधाकृष्ण चषक पटकावत प्रथम क्रमांक मिळवला. तिला ३ हजार १ व चषक देवून सन्मानित करण्यात आले.www.konkantoday.com