
उड्डाणपूल दुर्घटना चौकशीसाठी समिती चिपळुणात दाखल
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहाद्दूरशेखनाका येथील उड्डाणपूल दुर्घटनेप्रकरणी चौकशीसाठी जाहीर करण्यात आलेली केंद्रीय तज्ञ चौकशी समिती बुधवारी सायंकाळी उशिरा चिपळुणात दाखल झाली.
उड्डाणपूल कोसळल्यानंतर सार्वजनिक बाधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी भेट देवून महामार्गावरील कोसळलेल्या निर्माणाधीन उड्डाणपुलाची पाहणी केली व या उड्डाणपुलाची राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाच्या ३ तज्ञ समितीकडून तपासणी करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार टंडन कन्सल्टन्सीचे मनोध गुप्ता, हेगडे कन्सल्टन्सीचे सुब्रमण्यम हेगडे हे २ तज्ञ बुधवारी येथे दाखल झाले. ३ दिवसांच्या दौर्यावर आलेल्या या कमिटीने बुधवारी घटनास्थळी पाहणी केली. गुरूवारपासून चौकशीला सुरूवात होणार आहे.