चिपळुणात अखेरच्या टप्प्यात पाण्याच्या मागणीमुळे टँकरची मागणी वाढली
मे महिन्याच्या मध्यानंतर वादळी पाऊस सतत आठवडाभर कोसळला तरी त्याचा ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर कोणताही परिणाम झालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. उलट उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात पाणीपुरवठा करणार्या टँकरची मागणी वाढू लागली आहे. आणखी ८ गावात टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन पंचायत समितीस्तरावरून सुरू झाल्याने टंचाईग्रस्त गावांची संख्या २४ पर्यंत पोहोचली आहे.कडाक्याच्या उन्हात तालुक्यातील टंचाईग्रस्त गावात पाण्याची टंचाई वाढू लागली आहे. आतापर्यंत तालुक्यातील १६ गावात २ टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना प्रशासनाला कसरत करावी लागत आहे.www.konkantoday.com