
या हंगामात पर्यटकांनी कोकणला प्राधान्य दिले, चार लाख पर्यटकांकडून किल्ले सिंधुदुर्ग दर्शन
लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाही पर्यटकांनी मालवण शहर आणि ऐतिहासिक किल्ले सिंधुुदुर्ग पाहण्यासाठी गर्दी केयाचे दिसून आले. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ५० हजाराहून अधिक पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट दिल्याची अधिकृत आकडेवारी बंदर विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. २०२३-२४ च्या पर्यटन हंगामात ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी ४ लाख ३ हजार ३०९ पर्यटकांनी हजेरी लावली. यंदाची आकडेवारी पाहता कोरोनाच्या खडतर कालखंडानंतर यंदाचा हंगाम पर्यटन व्यावसायिकांना दिलासा देणारा ठरला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.www.konkantoday.com