
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामामुळे सेतू कार्यालय आता तहसीलच्या शेजारील गोदामात स्थलांतरित
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सेतू काार्यालयाचे ठिकाण नुकतेच बदलण्यात आले आहे. सध्या हे सेतू कार्यालय तहसीलदार कार्यालयाच्या बाजूला असलेल्या गोडावूनमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र बदललेल्या ठिकाणाला कोणताही फलक लावलेला नाही. त्यामुळे सेतू कार्यालय शोधण्यात नागरिकांचा वेळ जावू लागला आहे.शाळा, कॉलेजसाठी लागणारे दाखले मिळवण्यासाठी दरवर्षी शहरातीलल सेतू कार्यालयाबाहेर नागरिकांच्या रांगा लागतात. मात्र यावर्षी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुरू असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या कामामुळे सेतू कार्यालय आता हलवण्यात आले आहे. मात्र सेतू कार्यालयाची बदललेली जागा सांगणारे कोणतेही फलक व बदललेल्या जागेवरही कोणतीच पाटी लावलेली नाही त्यामुळे आठवड्यात सुरूवातीलाच सेतू कार्यालयात येणार्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.www.konkantoday.com