
कोकण महामार्ग हा देशातील सर्वात धोकादायक महामार्ग ठरू शकतो
नवीन कोकण महामार्ग बनवताना या जुन्या रस्त्यावरील अनेक अपघात करणारे डार्क पॉइंट जसेच्या तसे आहेत. अनेक धोकादायक वळणे आणि घाट मार्ग सरळ करणे आवश्यक होते पण ते प्रत्यक्ष झालेले नाही. ठेकेदारांनी मनमानी पद्धतीने जुना हायवे तसाच ठेवून तो दोन्ही बाजूने वाढवला आहे. आणि त्यामुळे भविष्यात हा महामार्ग अधिक धोकादायक होण्याची शक्यता आहे. यावर न्यायालयीन लढाई सुरू झाली आहे. हायवे सुरक्षित व्हावा याचे डिझाईन पुन्हा विचार करून यातले अतिधोकादायक डार्क पॉईंट आहेत तिथे सुधारणा करणे आवश्यक आहे. कोकणवासीयांच्या प्रवाशांच्या आणि पर्यटकांच्या कथेच्या दृष्टीने जरी खर्च तरीही हा खर्च करणे आवश्यक आहे. या बाजूला गाव आहे पलीकडे शाळा आहेत विद्यार्थ्यांना हायवें ओलांडून जावा लागतो. किँवा महत्त्वाचे नाके आहे तिथे असंख्य गाड्या दररोज थेट हायवे वर येतात आणि हायवे क्रॉस करून पलीकडे जातात. अशा धोकादायक ठिकाणी अंडरपास आणि सर्विस रोड नसल्यामुळे गाड्यांना थेट हायवे क्रॉस करावा लागतो. यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
याकरता न्यायालयीन लढाई बरोबरच लोक आंदोलन आणि जनतेचा दबावगट आवश्यक आहे . पुढील काळात पायाभूत सुविधांचा विकास करताना कोकणवासियांनी अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. आणि म्हणूनच कोकणातील मान्यवरांच्या मदतीने कोकण हायवे समन्वय समिती हा कोकणातील नागरीकांचा दबावगट. आम्ही बनवला आहे. खरे तर याला उशीर झाला आहे. पण आता यापुढच्या काळात कोस्टल हायवे , गुहागर विजापूर हायवे, रत्नागिरी नागपुर हायवे , अनेक महामार्ग विकसित होणार आहेत. आणि म्हणून त्या त्या परिसरातील नागरिकांनी जागरूक होणे या सर्व प्रक्रियेत सहभागी झाले पाहिजे.
या समन्वय समितीमध्ये
न्यायालयीन लढाई चे काम स्वतः अडवोकेट ओवेस पेचकर करत आहेत. कोणाचीही वाट न पाहता एकट्याने न्यायालयीन लढाई सुरू करणाऱ्या एडवोकेट ओवेस पेचकर यांचे आपण सर्वांनी आभार मानले पाहिजेत. गेली सत्तर वर्ष सातत्याने अन्याय होणार्या या कोकण प्रदेशाला न्याय मिळवून देण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या या अभियानात सहभागी होण्यासाठी खालील गुगल फॉर्म भरा.
गुगल फॉर्म
https://forms.gle/2jeDy4TNFY7gjPeA6
संजय यादवराव
अध्यक्ष कोकण हायवे समन्वय समिती
www.konkantoday.com
