पंढरपुरातील उत्सवाची तारीख ठरली, २ जूनला विठुरायाचे चरणस्पर्श कार्यक्रम
तब्बल ७९ दिवसानंतर पुन्हा एकदा विठुरायाच्या पायावरील दर्शनास २ जूनपासून सुरूवात होणार आहे. दरम्यान, विठुरायाच्या पूजेला पालकमंत्री उपस्थित राहणार आहेत. मात्र आचारसंहिता असल्याने पालकमंत्री उपस्थित राहणार असूनही देवाची पूजा मंदिराच्या पुजार्यांच्या हस्तेच केली जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.मंदिर संवर्धन कामामुळे १५ मार्चपासून देवांच्या पदस्पर्श व दर्शन बंद करून केवळ पहाटे सहा ते सकाळी अकरा इतकाच वेळ भाविकांना मुखदर्शन व्यवस्था ठेवली होती. आता गाभारा चौखांबी आणि सोळखांबी येथील कामे पूर्ण होत असल्याने आता भाविकांना २ जूनपासून थेट पायावर दर्शन घेता येणार आहे.www.konkantoday.com