
राष्ट्रीय आदर्श उद्योगरत्न गौरव पुरस्कार सौ स्वरुपा वैभव सरदेसाई यांना प्रदान
रत्नागिरी दि.२७: इंटिग्रेटेड सोशल वेल्फेयर सोसायटी (रजि.) चि. बेळगावी व नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन (रजि.) बेळगावीतर्फे राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा दिल्ली, गुजरात गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातून राष्ट्रीय आदर्श उद्योगरत्न गौरव पुरस्कार गणपतीपुळे येथील उद्योजिका सौ. स्वरुपा वैभव सरदेसाई यांना रविवारी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सौ. स्वरुपा सरदेसाई यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यातून अनेक व्यक्ती व सरकारी अधिकारी आपल्या नावाची शिफारस केली होती.हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळ, गणपत पार्सेकर कॉलेज ऑफ एज्युकेशन हास्मल, गोवा माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे कॉलेज येथे रविवारी (दि.२६ मे) रोजी प्रदान करण्यात आला. पुरस्कारामध्ये विशेष प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह, म्हैसूर फेटा, चंदनाचा कायमस्वरूपी हार व भारत सरकारचे केंद्रीय मंत्री यांचेकडून अभिनंदन पत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या कार्यक्रमाला दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, गोवा राज्यातील भारतीय सैन्य दलातील अधिकारी, सिने कलाकार, शिक्षण अधिकारी, राजकीय नेते व मठाधिश उपस्थित होते. सौ. स्वरुपा सरदेसाई यांनी या पुरस्काराचे श्रेय त्यांच्या सहकाऱ्यांना दिले. हा पुरस्कार त्यांना मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला व त्यांनी दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, गोवा सरकारचे व केंद्र सरकारचे आभार मानले. सौ. स्वरुपा वैभव सरदेसाई यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.