मी सर्वांची नावे घेणार… डॉ. अजय तावरे यांनी पोलिसांना दिली धक्कादायक माहिती

पुणे : कल्याणीनगर अपघातामधील अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी रक्त नमुने बदलल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. यातील डॉ. अजय तावरे याने पोलिसांना कारवाई दरम्यान ‘मी शांत बसणार नाही. मी सगळ्यांची नावे घेणार.’ असा इशारा दिला आहे. त्यामुळे डॉ. तावरे कोणाकोणाची नावे घेणार याकडे लक्ष लागले आहे. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अतुल घटकांबळे नावाच्या मध्यस्थाला अटक केली असून त्यानेच या डॉक्टरांना पैसे पुरवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात एका लोकप्रतिनिधीचे नाव देखील त्याने घेतले असून त्याविषयी तपास सुरू करण्यात आला आहे.कल्याणीनगर अपघातामधील अल्पवयीन आरोपीला वाचविण्यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस आणि प्रत्यक्षदर्शीना ‘मॅनेज’ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर, ससून रुग्णालयामधील डॉक्टरांच्या घशात नोटांची बंडले कोंबून थेट रक्त नमुनेच बदलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. आरोपी मुलाचे वडील विशाल अगरवाल याने डॉ. अजय तावरे यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधलेला होता. त्यावेळी फोनवरुन एका लोकप्रतिनिधीने डॉ. तावरे यांना आरोपी मुलाला मदत करण्याबाबत सांगितल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. हा लोकप्रतिनिधी कोण याकडे लक्ष लागले आहे. पोलिसांना याबाबत खात्रीलायक माहिती मिळाली असली तरी नाव सांगण्यास पोलीस हात आखडता घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button