गणपतीपुळे समुद्रकिनारी व मोरया चौक तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी स्टॉल बंद करण्याचे आदेश

गणपतीपुळे येथील गणपतीपुळे ग्रामपंचायतीने गणपतीपुळे समुद्रकिनारी व मोरया चौक तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी स्टॉल बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तशा स्वरूपाची जाहीर नोटीस गणपतीपुळे ग्रामपंचायती कडून काढण्यात आली असून ती स्टॉल धारकांना देण्यात आली आहे.या जाहीर नोटीसमध्ये गणपतीपुळे ग्रामपंचायतीने म्हटले आहे की, गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या सर्वे नंबर दोन मध्ये समुद्रकिनारी, मोरया चौक आणि इतर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या स्टॉल धारक व हातगाडी व्यावसायिकाना आपले व्यवसाय चालू ठेवण्याची मुदत 31 मे पर्यंत आहे. त्यामुळ सदर सर्व स्टॉलधारकांनी आपले स्टॉल दिनांक 31 मे पासून बंद करावे, असे आदेश देण्यात आहेत. तसेच तसेच दिनांक 31 मे रोजी मे रोजी सर्व स्टॉल धारक व हातगाडी व्यवसायिकांनी आपले स्टॉल बंद करून बंद करून 31 पासून ग्रामपंचायतीला सहकार्य करावयाचे आहे तसेच आपली जागा मोकळी करावयाची आहे असे स्टॉलधारकांना कळविण्यात आले आहे. त्यानंतर जे हातगाडी व्यवसायिक व्यवसायिक व स्टॉल धारक आपले स्टॉल चालू ठेवतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे गणपतीपुळे ग्रामपंचायतने आपल्या जाहीर नोटीस मध्ये म्हटले आहे. गतवर्षी गणपतीपुळे समुद्रकिनारी मे महिन्याच्या अखेरीस गणपतीपुळे समुद्राला मोठे उधाण आल्याने मोठ्या लाटांचा मारा समुद्रकिनार्‍यापर्यंत धडकला होता या मोठ्या लाटांच्या तडाख्यात गणपतीपुळे किनार्‍यावरील स्टॉल धारकांचे व हातगाडी व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button