
खेड नगरपरिषदेला अजूनही कायमस्वरूपी मुख्याधिकार्याची वानवा
खेड नगर परिषदेत प्रभारी मुख्याधिकार्यांचा सिलसिला अजूनही कायम आहे. पावसाळा तोंडावर येवून ठेपलेला असतानाही अजूनही कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्ती करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवरून कुठल्याच हालचाली दिसून येत नाहीत. यामुळे नागरिकांची परवड सुरू आहे. तसेच पावसाळा तोंडावर आला तरी आपत्तीपूर्व नियोजनही फक्त कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.येथील नगर परिषदेत हर्षला राणे यांच्या रूपाने कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्ती झाल्या होत्या. मात्र त्यांनी येथील पदभार स्वीकारल्यापासून विविध राजकीय पक्षांसह नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागले होते. यानंतर अवघ्या ६ महिन्यातच मुख्याधिकारी हर्षला राणे यांनी अन्यत्र तडकाफडकी बदली झाल्यानंतर येथील नगर परिषदेत प्रभारींचा सुरू झालेला सिलसिला आजमितीसही कायम आहे. www.konkantoday.com