
वाशिष्ठी नदीवरील धोकादायक पुलाचे ‘स्पेशल स्ट्रक्चरल ऑडिट’ सुरू
चिपळूण शहरातील मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्ठी नदीवरील बहादूरशेख नाका येथील ब्रिटिशकालीन पूल जीर्ण अवस्थेत असून धोकादायक बनलेल्या या पुलाचे स्पेशल स्ट्रक्चरल ऑडिट सुरू झाले आहे. पुण्यातील स्टक्ट सोर्स इंजिनियरिंग यांच्याकडून हे स्पेशल स्ट्रक्चरल ऑडिट सुरू आहे. काल व्हिडीओग्राफी झाल्यानंतर आज या पुलाची हॅमर टेस्ट करण्यात आली. गणेश विसर्जनानंतर मुख्य स्ट्रक्चरल ऑडिटला सुरुवात होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
www.konkantoday.com