किरण सामंतांकडून राजापुरातील सायबाच्या धरणाची पाहणी
रत्नागिरी :* शिवसेना नेते आणि उद्योजक किरण उर्फ भय्याशेठ सामंत यांनी काल (२६ मे) कोदवली (ता. राजापूर) येथील ब्रिटिशकालीन सायाबाच्या धरणाची पाहणी केली. सायबाच्या धरणाच्या कामाला अधिकचा निधी कसा मिळावा यासाठी आम्ही विचार विनिमय करू. वेळ पडल्यास अधिकचा निधी मिळावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून पाठपुरावा करू, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. यावेळी धरणासंबंधीच्या अडीअडचणींवर ही चर्चा केली.