
आज सोमवारी (ता. २७) दुपारी १ वा.दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर
बारावीच्या निकालापाठोपाठ आता दहावीच्या परीक्षेचा आज सोमवारी (ता. २७) दुपारी १ वा. ऑनलाइन निकाल जाहीर होणार आहे.कोकण विभागीय मंडळाचा निकालही जाहीर होणार असून सलग तेराव्या वर्षी हे मंडळ राज्यात अव्वल राहील, असा अंदाज आहे. कोकण मंडळातून रत्नागिरी जिल्ह्यातील १८ हजार ४५६ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८ हजार ९५० अशा एकूण २७ हजार ४०६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. त्यांचा निकाल जाहीर होण्याचे कुतुहल लागून राहिले आहे.www.konkantoday.com