
मदत कार्याचा गैर फायदा घेणाऱ्या लोकांपासून सावधान
चिपळूण ला महापूर येवून गेल्यानंतर अनेक व्यक्ती आणि सामाजिक संस्था मदती साठी पुढे सरसावत आहेत आणि माणुसकीचे दर्शन घडवीत आहेत.पण काही लोक काहीही नुकसान झालेले नसताना मदत घेत आहेत.काल लोटे येथील एक कुटुंब गेले दोन तीन दिवस चिपळूण मध्ये येवून मदत घेवून जात होते आणि पुढील किमान वर्षभर पुरेल इतका साठा करून घेतला होता .केवळ आजूबाजूच्या काही जागृत तरुणांना या गोष्टीचा संशय आला आणि गावकऱ्यांनी चौकशी केली त्यावेळी हा इतका साठा मदत कार्यातून चिपळूण मधून जमवून आणल्याचे समजले.त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा.बाहेरून येणाऱ्या मदत करणाऱ्या संस्थांना योग्य मार्गदर्शन होणे फार गरजेचे आहे नाहीतर अशा प्रवृत्ती चे अनेक जन फुकट मदत घेवून जातील आणि खरोखर गरजवंत असेच राहतील. प्रशांत देवळेकर
रोटरी क्लब, चिपळूण
www.konkantoday.com