
मुंबई-गोवा महामार्गावर लांजा येथे दोन दुचाकींच्या झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू.
मुंबई-गोवा महामार्गावर लांजा येथे शनिवारी झालेल्या दोन दुचाकींमध्ये अपघात होवून या अपघातात रत्नागिरी तालुक्यातील तोणदे येथील शैलेश शिवराम जाधव याचा मृत्यू झाला. जाधव हे आपल्या मोटरसायकलवरून तोणदेहून लांजा येथे जात असता रात्री लांजा आयटीआयजवळ समोरून येणार्या ऍक्टीव्हा गाडीवरील आशिष घडशी यांच्या दुचाकीने त्यांना धडक दिली. या अपघातामुळे जाधव हे दूर फेकले गेले व झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात आशिष घडशी हे जखमी झाले आहेत.www.konkantoday.com