
सिंधुदुर्गकन्या अभया हिला पी.एच.डी.साठी इंग्लंड मधील अत्यंत स्पर्धात्मक चेस स्टुडंटशिप मंजूर
आठ विद्यापीठातील ६ आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये समावेशअँटीकास्ट विचारांवर प्रॅक्टीस बेस संशोधन करणाऱ्या जगातील पहिल्या आर्ट संशोधक ठरणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील वर्दे मुळ गाव असलेल्या आणि ओरोस – सिंधुदुर्गनगरी येथे बालपण आणि प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झालेली सिंधुदुर्गकन्या प्रथितयश आर्टिस्ट अभया पुरुषोत्तम रजनी हिला इंग्लंड मधील प्रख्यात गोल्डस्मिथस् युनिव्हर्सिटी ऑफ लंडन या विद्यापीठातून पी.एच डी.करण्यासाठी युनायटेड किंग्डम मधील सर्वात स्पर्धात्मक अशा ‘चेस स्कॉलर’ म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. इंग्लंड मध्ये पी.एच.डी.साठी आर्ट्स अँन्ड ह्यूमॅनिटीज रिसर्च काऊन्सिल ह्या इंग्लंड च्या यू.के. रिसर्च अँन्ड इनोव्हेशन गव्हर्नमेंट व्यवस्थेमधून चेस स्टुडंटशिप दिली जाते. ही चेस स्टुडंटशीप इंग्लंड मधील आठ विद्यापीठातील पी.एच.डी . करणाऱ्या फक्त ५६ विध्यार्थ्यांना दिली जाते. त्यामध्ये इंग्लंड मधील स्थानिकांना प्राध्यान्य दिले जाते आणि इंग्लंड बाहेरच्या केवळ सहापेक्षा कमी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची निवड केली जाते.या सहा आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये अभया हिची निवड झाली आहे.चेस स्टुडंटशिप ही इंग्लंड मध्ये अतिशय स्पर्धात्मक फंडीग कॉम्पिटिशन मानली जाते ती मिळविण्यासाठीची प्रकिया फारच गुंतागुंतीची आणि अत्यंत किचकट असते.तसेच अत्यंत कठीण अशा स्पर्धात्मक कसोट्या तसेच तज्ज्ञ परिक्षकांच्या चिकित्सक मुलाखती बना सामोरे जावे लागते. या चेस स्टुडंटशिप मधून तीन ते साडेतीन वर्षांच्या पी.एच.डी.साठी लागणारी फी, रिसर्च स्टायपेंड आणि अतिरिक्त संशोधनासाठी लागणारा खर्च करता येणार आहे.अभया चे संशोधन कंन्टेपररी आर्ट आणि नवीन वैकल्पिक अध्यापन शास्त्र या क्षेत्रामध्ये आहे.तिचा संशोधन विषय ‘अॅन्टि कास्ट एम्बांडिमेंट काग्निझिंग द अनटेकग्नाईज्ड अनसेंस्टूल नौलेज आफ दलित वूमन ‘ या विषयावर आहे. म्हणजे जाती विरोधी मूर्त चेतना,अनोळखी असलेले दलित स्त्रियांचे,पूर्वजांचे ज्ञान ज्ञात करण्यासाठी.अभया पुरुषोत्तम रजनी हीचे संशोधन पूर्ण झाल्यावर ती अॅन्टि कास्ट विचारावर प्रॅक्टिस बेस संशोधन करणाऱ्या जगातील पहिल्या पी.एच.डी . आर्ट संशोधक असणार आहेत. अभयाचे संशोधन तिच्या मूळ वर्दे गावी आणि लंडन या दोन साईटवर होणार आहे. जातीशी संबंधित पारंपरिक कलाकुसर आणि खाद्य संस्कृतीवर आधारित संशोधन असणार आहे. तिच्या संशोधनामध्ये दलित स्त्रिया ,क्विअर ट्रान्स स्त्रिया आणि नॉन बायनरी सेक्शुअलिटी संबंधित माणसांवर केंद्रित आहे. तिच्या चिकित्सात्मक विचारांमधून अँटी कास्ट फेमिनिस्ट पेडागॉगी म्हणजेच जाति विरोधी स्त्रिवादावर उभारलेल्या अध्यापन शास्त्राच्या शोधावर उभारलेल्या आधारित आहे. अभयाच्या वैचारिक चिकित्सेमध्ये तीन क्षेत्रांना महत्त्वाचे स्थान आहे. दलित स्त्रिवाद, ब्लॅक क्वीअर स्त्रीवाद आणि वेगळा अल्टरनेटिव्ह वैकल्पिक अध्यापन शास्त्र या मधील विचारवंतांवर आधारित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि कोकणातील नामवंत दलित स्त्रिवादी लेखिका उर्मिला पवार,थेनमोझी,सुंदरराजन,शर्मिला रेगे यांच्याबरोबर ब्लॅक क्वीअरय स्त्रीवादी ऑड्रे लॉर्ड, बेल हूक्स,पैटरीशिया कौलिन हिल्स आणि प्रख्यात अध्यापन शास्त्रज्ञ पावलोफ्रेअर यांच्या सिध्दांतावर आणि जगण्याच्या अनुभवातून निर्माण झालेल्या वैचारिक प्रगल्भतेवर आधारित आहे. या प्रख्यात विचारवंतांच्या बरोबरच ज्यांच्या कामाची, कौशल्याची आणि प्रगल्भतेची कधी दखल घेतली गेली नाही.अशा अज्ञात दलित स्त्रियांवरही आधारलेली आहे. अभयाच्या या सर्वात मोठ्या यशामध्ये तिची आई आणि तिच्या गोधडी या कलेक्टिव्हच्या सहनिर्मात्या रजनी कदम आणि तिचे वडील पुरूषोत्तम कदम यांनी दिलेल्या प्रेरणेचे, समर्थनाचे आणि मानसिक बळाचे फार मोठे श्रेय असल्याचे अभया आवर्जून सांगते.अभयाचे पार्टनर आणि सहयोगी सैम मॅकनिल यांच्याही प्रोत्साहनाचा फार मोठा वाटा आहे. अभया चे पी.एच.डी. चे सुपरवायझर प्रख्यात आर्टिस्ट्स डॉ. मिशेल विलिसम्स गॅमाकर, डॉ.एल रेनॉल्ड्स आणि गोल्डस्मिथ युनिव्हर्सिटी चे संशोधन प्रमुख डॉ.एडगर स्मिस यांचे फार मोठे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. अभया ही सेवानिवृत्त टाऊन प्लॅनिंग ऑफिसर पी. एल . कदम आणि सेवानिवृत्त बैंक अधिकारी रजनी कदम यांची कर्तबगार मुलगी आहे. अभया ही जेष्ठ पत्रकार, लेखक माधव कदम यांची भाची आहे.