
पावस कोव्हीड केअर सेंटरला सर्वतोपरी सहकार्य करणार- ना,उदय सामंत
रत्नागिरी पावस मार्गावरील गोळप सडा येथे अरबी मद्रसा बंद करून सुरू करण्यात आलेल्या पावस कोव्हीड सेंटरला शासनाचा प्रतिनिधी म्हणून सर्व प्रकारचे सहकार्य दिले जाईल असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना,उदय सामंत यांनी दिले आहे, मजलीस फलाय ए दारेन या संस्थेतर्फे गोळप सडा येथे सुरू करण्यात आलेल्या पावस कोव्हीड केअर सेंटरचे उदघाटन ना,उदय सामंत, खासदार विनायक राऊत, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ, बबिता कमलापुरकर, राष्ट्रवादीचे नेते बशीर मुर्तुझा आदींच्या हस्ते करण्यात आले, खासदार विनायक राऊत यांनी आपले विचार व्यक्त करताना पावस येथे कोव्हीड केअर सेंटर सुरू केल्याबद्दल संयोजकांना धन्यवाद दिले आणि प्रत्येकाने कोरोनाकाळात काळजी घ्यावी असे आवाहन केले, ना,उदय सामंत यांनी ठाकरे सरकार कोरोनावर मात करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करीत आहे,तसेच करीत असलेल्या विविध उपाय योजनांची माहिती दिली,रत्नागिरी येथे लवकरच ऊर्दू भवन सुरू करण्यात येणार असल्याचे म्हणाले, संयोजकां तर्फे ना,उदय सामंत,खासदार विनायक राऊत आदींचा सत्कार करण्यात आला, या प्रसंगी माजी आरोग्य व बांधकाम सभापती बाबु म्हाप,वरिष्ठ पत्रकार आलिमियां काझी, मन्सूर काजी,रफिक बिजापुरी ऐजाज खान,शफी काझी,मुद्दसर मुकादम, मौलाना शकूर खान, पोलिस निरीक्षक गावीत,तहसीलदार शशिकांत जाधव, शौकत काझी,रहीम अकबर अली, यांच्यासह पावस पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते, गोळप सडा येथे सुरू झालेल्या पावस कोव्हीड सेंटर मुळे पावस, गोळप, गावखडी, पूर्णगड, कसोप, गणेश गुळे,फणसोप पंचक्रोशीतील नागरिकांना उपयोग होणार आहे,अरबी मद्रसा बंद करून कोव्हीड सेंटर सुरू केल्याबद्दल ना,उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांनी संयोजकांचे अभिनंदन केले आणि या ठिकाणी रुग्णांना उत्तम दर्जाची सेवा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली, आणि येथे कमीतकमी रुग्ण यावेत असे म्हणाले,तसेच येणारे सर्व रुग्ण बरे होऊन आपापल्या घरी जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली
www.konkantoday.com