आता जुन्नरचे बिबटे गुजरातच्या जामनगर येथील सेंट्रल झू मध्ये पाहुणे म्हणून जाणार
आता जुन्नरचे बिबटे गुजरातच्या जामनगर येथील सेंट्रल झू मध्ये पाहुणे म्हणून जाणार आहेत. गुजरातमध्ये बिबट्याच्या वास्तव्यासाठी उपाययोजना तयार करण्यात आल्यात. त्यासाठीची केंद्राची परवानगीही मिळालीय, त्यामुळे आता जुन्नरचे बिबटे गुजरातच्या जामनगर येथील सेंट्रल झू मध्ये पाहुणे म्हणून जाणार आहेत.जुन्नर वनविभागातील खेड,आंबेगाव शिरुर आणि जुन्नर तालुक्यात मानव आणि बिबट्यांचा संघर्ष वाढलाय. हा संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाने काही उपाययोजना सुरू केल्यात.माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे विस्तारिकरण करण्यात आलं याआधीचे 40 आणि नवीन 60 बिबट्यांना या ठिकाणी हक्काचा निवारा मिळालाय. यासोबत AI अर्थात आर्टिफिशीयल इंटेलिजियन्सद्वारे लक्ष ठेवले जाईल. तसेच १५० नवीन पिंजरे,रेस्क्यू वाहने आणि व्याघ्र प्रकल्पाप्रमाणे स्पेशल प्रोटेक्षण फोर्स वाढवला जाणार आहे. यासोबतच काही बिबटे गुजरातच्या जामनगर येथील सेंट्रल झू मध्ये पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिलीwww.oonkantoday.com