दक्षिण मुंबईतील ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक हरपला, दक्षिण मुंबईतील माजी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांचं निधन
शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे घराण्याशी इमान कायम राखणारा कट्टर शिवसैनिक आणि पक्षाचे दक्षिण मुंबईतील माजी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांचे शनिवारी निधन झाले.ते 61 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, शनिवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर आज संध्याकाळी गिरगाव येथील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. पांडुरंग सकपाळ यांच्या निधनामुळे ठाकरे गटावर शोककळा पसरली आहे.दक्षिण मुंबईतील एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून पांडुरंग सपकाळ यांची ओळख होती. पांडुरंग सकपाळ हे शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी एक होते. बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वासू साथीदार म्हणून ते ओळखले जात होते.www.konkantoday.com