प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत एक वर्षात २ लाख ३० हजार नवे खातेदार
दुर्घटनेत मृत्यू किंवा अपंगत्व झाल्यास प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. एका वर्षात तब्बल २ लाख ३० हजार एवढे नवे खातेदार रत्नागिरी जिल्ह्याला मिळाले आहेत.१ जून ते ३१ मे कालावधीसाठी प्रधानमंत्री सुरक्षा योजना लागू करण्यात येते. संबंधित बँक हप्त्याची रक्कम खात्यातून थेट योजनेसाठी भरत असते. या योजनेमध्ये सदस्य झालेल्या व्यक्तींना ७० वर्षे वयापर्यंत लाभ घेता येतो. बँकेतील खाते बंद झाले किंवा खात्यात कमी रक्कम असेल तर योजनेचा लाभ घेता येत नाही, विमा संरक्षण केवळ एक़ा खात्याकरिता दिले जाते. या योजनेसाठी यापूर्वी प्रतिव्यक्ती १२ लाख रुपये एवढा हप्ता ठरवून देण्यात आला होता. त्यात आता वाढ करण्यात आली असून तो २० रुपये प्रतिव्यक्ती करण्यात आला आहे.www.konkantoday.com