रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासात 82 नवे रुग्ण, एकूण 2148, 1479 रुग्ण बरे

गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 82 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2148 झाली आहे. दरम्यान 33 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1479 झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय 9, समाजकल्याण मधील 19, कामथे, चिपळूण 4, आणि कळबणी खेड येथील 1 रुग्ण आहे.
पॉझिटिव्ह रुग्णांचे विवरण खालील प्रमाणे
रत्नागिरी – 32
कामथे – 17
कळबणी – 16
लांजा – 5
गुहागर – 7
देवरुख – 1
ॲन्टीजेन टेस्ट – 4
घारेवाडी, चिपळूण येथील 58 वर्षीय रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यु झाला आहे. तसेच 25 जुलै 2020 रोजी मृत्यु झालेल्या एका कोरोना रुग्णाचा अहवाल उशीरा प्राप्त झाल्याने त्याची नोंद आज घेण्यात आल्याचे जिल्हा रुग्णालयाकडून कळविण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या आता 73 झाली आहे.
तालुकानिहाय मृतांचा आकडेवारी पुढीलप्रमाणे
रत्नागिरी – २०
खेड – ६
गुहागर – २
दापोली – १४
चिपळूण – १४
संगमेश्वर – ७
लांजा – २
राजापूर – ७
मंडणगड – १
सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह – 2148
बरे झालेले – 1479
मृत्यू – 73
एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 596
संस्थात्मक विलगीकरण
संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 47, समाजकल्याण, रत्नागिरी – 6, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – 26, उपजिल्हा रुग्णालय, कळबणी -14, कोव्हीड केअर सेंटर घरडा – 4, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे – 7, कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली – 20, गुहागर – 1, संगमेश्वर – 1, पाचल -1असे एकूण 127 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.
होम क्वॉरंटाईन
मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 37 हजार 417 इतकी आहे.
17 हजार पेक्षा जास्त निगेटिव्ह
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 19 हजार 688 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 19 हजार 235 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 2148 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 17 हजार 075 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 453 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 453 रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत. यामध्ये घरडा केमिकल्सच्या खाजगी लॅबचे आकडे समाविष्ठ नाहीत.
परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात दि. 07 ऑगस्ट 2020 अखेर एकूण 2 लाख 52 हजार 393 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या 1 लाख 13 हजार 423 आहे.
होम क्वारंटाईन म्हणून शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांक, नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२३३ व २२६२४८, आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
सदरची आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोव्हीड-19 कक्षाकडून प्राप्त झाली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button