प्रचंड वेगानं चक्रीवादळ धडकणार…; IMD कडून इशारा

* हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून, चक्रीवादळाची निर्मिती होत आहे. चक्रीवादळामुळे देशभरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यातील किनारपट्टी प्रदेशात मोठ्या हवामान बदलाची शक्यता आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत या वादळाचा काहीप्रमाणात तडाखा हा राज्याला देखील बसू शकतो. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात राज्यात 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहू शकतात, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button