
रत्नागिरी नगर परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे काम प्रगती प्रथावर पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून पाहणी
राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी – रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी ₹ 20 कोटी खर्चून रत्नागिरी येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या रत्नागिरी नगरपालिका इमारतीच्या बांधकामाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, शहरप्रमुख बिपीन बंदरकर ह्यांच्यासह अन्य संबंधित उपस्थित होते. इमारत पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना या ठिकाणी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेतwww.konkantoday.com