
१ जून ते ३१ जुलै या कालावधीत राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात मासेमारी नौकांना मासेमारीला बंदी
मासेमारी हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. मासळीच्या साठ्याचे जतन करण्याच्या उद्देशाने १ जून ते ३१ जुलै या कालावधीत राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात मासेमारी नौकांना मासेमारीला बंदी घातली आहे.
महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमानुसार मासळीच्या साठ्याचे जतन करण्याच्या हेतूने शासनाने हा बंदी कालावधी निश्चित केला आहे. हा माशांचा प्रजनन काळ असल्याने मोठ्या प्रमाणात मासळीचा साठा वाढतो. म्हणून १ जून ते ३१ जुलै या कालावधीत राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात मासेमारी नौकांना मासेमारीला बंदी घालण्यात आली आहे.
www.konkantoday.com