
चिपळूण शहरातील शंकरवाडी रस्ता होणार १२ मीटरचा होणार, मुख्याधिकार्यांचे आश्वासन
चिपळूण शहरातील शंकरवाडी रस्ता विकास आराखड्यानुसार १२ मीटरचा होणार आहे. पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी सोमवारी नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठीच्या आयोजित बैठकीत दिली. तर काही नागरिकांनी हा रस्ता ८ मीटरचाच करावा अशी मागणी केली. दोन दिवसांपूर्वी या रस्त्यावरील ९० टक्के अतिक्रमणे हटवण्यात आली असून लवकरच उर्वरित अतिक्रमणावर जेसीबी फिरवला जाणार आहे.शहर विकास आराखड्यात रामेश्वर मंदिर ते धामणस्कर चौक हा शंकरवडीतील रस्ता १२ मीटरचा असून दोन्ही बाजूला गटारे आहेत. मात्र सध्या प्रत्यक्षात हा रस्ता फार कमी रूंदीचा असून त्याला अतिक्रमणाने वेढले आहे. www.konkantoday.com