आमदार पांडुरंग निवृत्ती उर्फ पी. एन. पाटील यांचे निधन

कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचा ढाण्या वाघ अशी प्रतिमा असलेले, काँग्रेसशी अतूट निष्ठा ठेवून आयुष्यभर वाटचाल केलेले आणि सामान्य कार्यंकर्त्याचा आधारवड बनलेले नेते आमदार पांडुरंग निवृत्ती उर्फ पी. एन. पाटील (वय ७१ रा.मुळ गांव सडोली खालसा, ता.करवीर सध्या राहणार राजारामपुरी कोल्हापूर) यांचे गुरुवारी सकाळी सहा वाजता मेंदूत रक्तस्त्राव होवून आकस्मिक निधन झाले. त्यांच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांवर दू:खाचा डोंगरच कोसळला. कमालीचे पोरकेपण साऱ्यांनीच अचानकपणे अनुभवले. अनेक कार्यकर्ते ओक्साबोक्सी रडत होते. कुणी कुणाला सावरायचे अशी स्थिती निर्माण झाली. त्यांच्या पश्चात मुलगा राजेश, राहूल, विवाहित मुलगी टीना, बहिण दमयंती मोहिते यांच्यासह मोठा परिवार आहे.अंत्यविधी सडोली खालसा येथे ११ वाजता होणार आहे..www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button