
रेल्वे प्रवासातील प्रतीक्षा यादीवरील प्रवास आता प्रवाशांना पडणार महागात.
रेल्वेगाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल होताच बरेच प्रवासी यादीवरील तिकिटावर आरक्षित डब्यातून प्रवास करत असतात. यापुढे हा प्रवास खूपच महागात पडणार आहे. यात केवळ दंड भरून प्रवाशांची सुटका होणार नाहीत. शिवाय त्यांना आरक्षित डब्यातून प्रवास करण्याचीही मुभा दिली जाणार नाही. दंड वसूल केल्यानंतर वेटींगवर असलेल्या प्रवाशांना कोणत्याही स्थानकात डब्यातून खाली उतरण्यात येणार आहे. या नियमाची प्रत्यक्षात अंमलबजावणीदेखील सुरू झाली असल्याने चाकरमान्यांची डोकेदुखी वाढली आहे. www.konkantoday.com