
बौध्दजन हितवर्धक संघ कापडगावसम्यक सम्बुध्द तथागत गौतम बुध्दांचा 2586 वा जयंती महोत्सव
बौध्दजन हितवर्धक संघ कापडगाव स्थानिक, मुंबई, रजिस्टर आणि महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने *सम्यक सम्बुध्द तथागत गौतम बुध्दांचा 2586 वा जयंती महोत्सव दिनांक 23 मे 2024 रोजी म्हणजेच बुध्द जयंती* दिनी महोत्सव स्वरूपात साजरा करण्यात येत आहे. *सम्यक सम्बुध्द तथागत गौतम बुध्द जयंती महोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे* सविस्तर नियोजन सोबत *(jpeg मध्ये)* देण्यात येत आहे. तरी बुध्द जयंती महोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे संक्षिप्त नियोजन खालीलप्रमाणे आहे.*दिनांक 23 मे 2024 रोजी म्हणजेच सम्यक सम्बुध्द तथागत गौतम बुध्द जयंती*….1) *राष्ट्रीय ध्वजारोहण* :- 09.00 वाजता होऊन कार्यक्रमाची सुरुवात होईल. व त्यानंतर 2) *बुध्द पूजा परित्राण पाठ* :- सकाळी 09.40 वाजता घेण्यात येईल.3) *प्रबोधनात्मक मौलिक भाषण* :- सकाळी 10.40 ते 11.40 *आयु. प्रोफे. सत्यवान कोत्रे (पटवर्धन महाविद्यालय, रत्नागिरी)* *विषय :- मला गवसलेले तथागत गौतम बुध्द.*4) *करमणूक कार्यक्रम* :- बुध्द भीम गीते व नाटक – आई अशीच असते. आपल्या सर्वांना कळविताना आनंद होतो की, आपल्याच गावांमधील *आदरणीय प्राध्यापक सत्यवान कोत्रे* हे *सम्यक सम्बुध्द तथागत गौतम बुध्दांच्या 2586 व्या जयंती महोत्सव दिनांक 23 मे 2024 रोजीचे कार्यक्रमामध्ये* आपले मौलिक विचार आपल्या सर्वांसमोर मांडणार आहेत. त्यांचे हे विचार ऐकण्यासाठी गावातील आणि आजूबाजूच्या गावचे परिसरातील सर्व लोकांनी बुध्द विहार कापडगाव येथे नमूद करण्यात आलेल्या वेळेत एकत्रित होऊन त्यांचे विचार ऐकावे. ही आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे. आपल्याच कापडगावातील एक दांडगे व्यक्तीमत्व, उच्च शिक्षित होऊन, प्राध्यापक होऊन जेव्हा आपली मते मांडतो तेव्हा ही बाब आपल्या सर्वांना अभिमान वाटावी अशी आहे. त्यामुळे आपण सर्वांनी *बुध्द विहार कापडगाव येथे दिनांक 23 मे 2024 रोजी* वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. या बुध्द जयंती महोत्सव कार्यक्रमासाठी शेजारी पंचक्रोशीतील गावांमधील आणि कापडगावातील *वाडी प्रमुखांना* विनंतीपूर्वक कळविण्यात येते की, त्यांनी आपल्यासह, आपापल्या वाडीतील सर्व लोकांना *आदरणीय प्राध्यापक सत्यवान कोत्रे* यांचे मौलिक विचार/भाषण ऐकण्यासाठी आणि बुध्द जयंती महोत्सव अधिक बहारदार करण्यासाठी बुध्द विहार कापडगाव येथे वेळेवर उपस्थित राहावे. हे निमंत्रण वजा विनंती समजून तसेच *बौध्दजन हितवर्धक संघ कापडगांव स्थानिक, मुंबई आणि रजिस्टर संघ आणि महिला मंडळ यांचे अध्यक्ष व कार्यकारणी यांच्यावतीने आपणाला विनंतीपूर्वक कळविण्यात येत आहे. तरी सर्वांनी आपली उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. धन्यवाद !!💐🌻🙏🏼🌹💐🙏🏼 आपला स्नेहांकित…. 🙏🏼 – प्रभाकर रुक्मिणी राजाराम कांबळे, कापडगाव, रत्नागिरी.( *सहसचिव- बौध्दजन हितवर्धक संघ कापडगांव, रजि.* )