
बँक ऑफ इंडियाच्या पूर्णगड शाखेत बनावट दागिने गहाण ठेवून 18 लाखाची फसवणूक तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
बँक ऑफ इंडियाच्या पूर्णगड शाखेत 448.300 ग्रॅमचे बनावट दागिने ठेवून तब्बल 18 लाख 21 हजार रुपयांचे कर्ज घेत फसवणूक केली. याप्रकरणी तिघांविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना 5 जुलै 2023 ते 5 मार्च 2024 या कालावधीत घडली आहे.अमेय सुधिर पाथरे (34,रा.पावस खांबडवाडी,रत्नागिरी), अमोल गणपती पोतदार (47,रा.कोल्हापूर), प्रभात गजानन नार्वेकर (32,रा.कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. त्यांनी संगनमताने आपल्याकडील बनावट दागिने बँक ऑफ इंडियाच्या पूर्णगड शाखेत ठेवून त्या बदल्यात 18 लाखांचे कर्ज घेउन बँकेची फसवणूक केली. त्यांच्या विरोधात भादंवि कायदा कलम 406,420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.www.konkantoday.com